सोडचिठ्ठी घेतलेल्या तरुणावर कोयत्याने वार

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड नाशिक शहर नेहमीच खून खराबा घटनेने हादरते नुकतेच जय भवानी रोडवर पहाटे ५ वाजेच्या सुमारास एका ४० वर्षीय तरूणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला.
अमोल मेश्राम असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल मेश्राम हा रोज पहाटे घराजवळील मंदिरात दर्शनासाठी जायचा.नेहमीप्रमाणे तो  पहाटे ५ वाजेच्या सुमारास दर्शनासाठी गेला होता.बराच वेळ होऊनही तो घरी न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या आईने बाहेर
डोकावून पाहिले असता त्यांना अमोल जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

घर परिवारातील लोकांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी अमोलला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.मात्र घाव वर्मी लागल्याने तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले.

अमोल हा जय भवानी रोडवरील साबरमती सोसायटीमध्ये आई-वडिलांसमवेत रहात होता. काही दिवसांपूर्वीच त्याची फारकत झाल्याचेही समजते. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.हा खून नेमका कोणी आणि कशासाठी केला, हे मात्र समजू शकले नाही.पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!