श्रीरामपूर-मुंबई बस पुन्हा सुरू:आंदोलनाला यश
श्रीरामपूर दिपक कदम गेली सहा वर्षांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई एसटी बस अखेर (६ ऑक्टोबर) रात्री ८.३० वाजता पुन्हा सुरू झाली. या ऐतिहासिक निर्णयामागे गेली सहा महिन्यापासून सर्वपक्षीय आंदोलनांचा पाठपुरावा असून, हे यश आंदोलनकर्त्यांचं आहे. मात्र, या बस सुरू होण्याचे श्रेय आमदार हेमंत ओगले यांनी घ्यायचा केलेला प्रयत्न "फुकटचा आणि केविलवाणा" असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी केली आहे.
सहा महिन्याच्या संघर्षानंतर यश श्रीरामपूर-मुंबई बस गेली सहा वर्षे बंद होती.ती पुन्हा सुरू व्हावी यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन,निवेदने आणि पाठपुरावा केला.शेवटी आगार प्रमुख अनिल बेहेरे यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेत पंधरा दिवसापूर्वी लेखी आश्वासन दिलं आणि बस सुरू झाली.
बस सुरू करण्यात आमदार हेमंत ओगले यांचा कोणताही सहभाग नव्हता.साधे दोन ओळीचे पत्र देखील दिले नाही परंतु गाडी सुरू होणार हे कळताच आमदार ओगले आणि त्यांचे काही कार्यकर्ते अचानक प्रकट झाले आणि नारळ फोडून फोटोसेशन करून निघून गेले.
त्यानंतर सोशल मीडियावर, विशेषतःव्हॉट्सअॅपवर, ही बस त्यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाल्याचे खोटे संदेश पसरवण्यात आले. हे जनतेची दिशाभूल करणारे असून अशा खोट्या श्रेय लाटण्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यांना श्रेय घ्यायच असेल तर रोज सकाळी आठ वाजता श्रीरामपूर मुंबई बस चालू होती ती बस कोरोना काळापासून बंद केली आहे.
ती गाडी पुन्हा सुरू करून दाखवावे आणि त्याचे श्रेय बिंदास आ.ओगलेनी घ्यावे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू असेही त्रिभुवन यांनी स्पष्ट केले आहे
श्रीरामपूर आगाराला मिळालेल्या १० बस आमदाराची प्रयत्न नाही श्रीरामपूर आगाराला मिळालेल्या १० नवीन
एसटी बसंबाबतही स्पष्टीकरण देताना मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये म्हणाले,की गाड्या आमदार ओगले यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या नाहीत, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार राज्यातील प्रत्येक आगाराला न मागता १० बस देण्यात आल्या आहेत.
अजूनही दोन टप्प्यांत प्रत्येकी पाच अशा १० बस येणार आहेत, कारण जुन्या अनेक गाड्या स्क्रॅप करण्यात आल्या आहेत असे ते म्हणाले मा.नगरसेवक मुख्तार शहा यांनीही हेमंत ओगले यांच्यावर टीका करताना सांगितले, “जर यापुढे आमदारांनी अशाप्रकारे खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तर तो प्रकार खपवून घेतला जाणार नाही.”
असा इशारा माजी नगरसेवक मुक्तार शहा यांनी दिला आहे आहे“श्रीरामपूरकर जनता आता जागरूक झाली आहे. आम्ही आंदोलन करून मिळवलेलं यश कुणी हायजॅक करणार असेल, तर त्याचा निषेध होणारच.” माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे
विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल म्हणाले की मतदारसंघात अनेक कामे प्रलंबित आहेत त्या कामाकडे त्यांनी लक्ष केंद्रित करावे.
सुभाष त्रिभुवन यांनी केलेले कामात ढवळाढवळ करू नये अन्यथा रिपाई स्टाईलने उत्तर दिले जाईल त्यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे गुरुनानक मार्केटचे बिट्टू बत्रा बन्सीलाल फेरवानी संदीप पवार रोशन बात्रा दीपक माखिजा अहमद शहा आदी उपस्थित होते.
