नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील दहावा मैल- जानोरी एअरपोर्ट या रस्त्यावर चार महिन्यांपासून पडलेल्या जीवघेण्या खड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना दररोज लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खड्डे भरण्याबाबत अनेक वेळा मागणी करूनही बांधकाम विभागाने या रस्त्यावर कुठलीही दुरुस्ती केलेली नाही.
हा रस्ता आता मृत्यूचा सापळा होऊ इच्छित आहे या ठिकाणी दोन ते तीन दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक जण अपघातात जायबंदी झाले आहेत. रस्ता दुरुस्तीबाबत दिंडोरी सार्वजनिक बांधकाम विभाग उदासीन असल्याने येत्या आठ दिवसांत खड्डे न भरल्यास उबाठा महिला आघाडीतर्फे त्या खड्ड्यांत वृक्षारोपण करण्याचा इशारा उबाठा महिला आघाडी तालुकाप्रमुख अस्मिता जोंधळे यांच्यातर्फे देण्यात आला.
