नाशिक दिनकर गायकवाड पेठ येथील बसस्थानकाचे निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्वरीत याबाबत दखल घेवून चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पेठ आगार बसस्थानक इमारतीचे काम सुरु आहे.या बसस्थानकासाठी कोट्याविधी रुपयांचा निधी उपलब्ध असुनही वार्ताफलक लावलेला नाही. तसेच तीन
वर्षांपासून या बसस्थानकाचे काम सुरू असून आतापर्यंत फक्त २० ते ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.पावसाळ्यात प्रवाशी वर्गाच मोठ्या प्रमाणात हाल होत असतात.निवारा शेडही अपुर्ण पडत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. चांगल्या दर्जाचे काम करावे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा रामदास वाघेरे,जेष्ठ नेते चंदशेखर काळे, विजय देशमुख,सोपान पवार आदींनी दिला आहे.
