युवानेते डॉ.सुजय विखे यांची भावनिक प्रतिक्रिया
झरेकाठी सोमनाथ डोळे परवा भेटलो,जेवलो गप्पा मारल्या, अजूनही विश्वास बसत नाही आ. कर्डिलेंच्या निधनावर अशी भावनिक प्रतिक्रिया मा.खा. डॉ.सुजय विखे यांनी नुकतीच व्यक्त केली.
राहुरी नगर पाथर्डी,विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या अकस्मित निधनाने संपूर्ण जिल्हा शोक सागरात बुडाला आहे.शिवाजीराव कर्डिले यांनी ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय,आणि सहकार क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गुरुवारी आमदार कर्डिले हे डॉ. सुजय विखे पा. यांच्या निवासस्थानी गेले होते.एकत्र जेवण, संवाद आणि विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर काही तासातच त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही वार्ता काळजात धस्स करणारी ठरली अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडली आहे. परवा आम्ही एकत्र होतो आणि आज ते आपल्यात नाहीत,हे स्वीकारणं कठीण आहे,अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे पा यांनी दिली.
