नाशिक दिनकर गायकवाड - सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिल कुमार निकुंभ याला अंबड गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईदर परिसरातून सापळा रचत ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,निखिल निकुंभयाच्यावर नाशिक शहरातील अंबड,सातपूर, सरकारवाडा, नाशिक रोड,घोटी आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.त्याच्यावर सातपूर गोळीबार प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, अंबड पोलीस ठाण्यात बळजबरीने बंगला बळकावून खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. अंबड गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार
भूषण सोनवणे आणि भगवान जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, संशयित आरोपी मीरा-भाईंदर परिसरात लपल्याची माहिती मिळाली. तत्काळ पथकाने ठाण्यातील त्या भागात सापळा रचला आणि आरोपीला शिताफीने अटक करण्यात आली. त्यानंतर
त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्विंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षिरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान
जाधव,चारूदत्त निकम आणि सविता कदम यांनी सहभाग नोंदवला.गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील सराईत गुन्हेगारांमध्ये एकप्रकारची धास्ती निर्माण झाली असून,पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
