आगामी निवडणुकांत महायुतीच्या सत्तेसाठी तयारीला लागा

Cityline Media
0
मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ॲड.रवींद्र पगार यांचे प्रतिपादन

नाशिक दिनकर गायकवाड आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा झेंडा फडकावण्यासाठी जोमाने कामाला लागा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी केले आहे.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या वतीने एकत्रित लढविण्यात येणार आहे; परंतु काही कारणास्तव मैत्रीपूर्ण जागा लढाई झाल्यास येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सक्षम उमेदवार तयार ठेवावा लागेल, अशा सूचनाही जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी यावेळी बोलताना केल्या.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार यांच्या वतीने प्रत्यक्ष तालुकावार जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात येत आहे.

या दौऱ्यांतर्गत मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक ॲड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पार पडला त्यावेळी ॲड.पगार बोलत होते या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आगामी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर मालेगाव तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश पवार, मालेगाव पूर्व तालुकाध्यक्ष रतन हलवर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल कदम, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, ग्राहक संरक्षण सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, जिल्हा सरचिटणीस विलास सानप आदी उपस्थित होते. यावेळी

महिलाध्यक्षा प्रतिभा खैरनार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल सोनवणे, तालुकाध्यक्ष अमोल निकम, जिल्हा पदाधिकारी प्रशांत महाजन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सुजय आहेर, सोशल मीडिया सेलचे रोहित बोरसे, विश्वास पवार,प्रदीप खैरणार, संदीप शेवाळे,रवींद्र पवार, सुभाष पाटील,सुरेश खैरणार आदींनी चर्चेत सहभाग घेतला. प्रास्ताविक किशोर इंगळे यांनी केले. आभार सतीश पवार यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!