गुन्हे प्रतिबंध करणे करिता शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती अभियान
राहुरी प्नतिनिधी येथील पोलिस ठाण्याच्या वतीने डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला यावेळी सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना पोस्को व सायबर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने ऑपरेशन मुस्कान भाग -१ अंतर्गत मागील दीड वर्षात आतापर्यंत ९१ मुलीची सुटका केलेली असून उर्वरित राहिलेल्या ११ मुलींचा देखील शोध युद्ध पातळीवर सुरूच आहे.परंतु अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे गुन्हे तथा लैंगिक शोषणाचे गुन्हे होऊच नये यासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने ऑपरेशन मुस्कान भाग- २ हेड अंतर्गत जागरूकता अभियान सुरू केलेले आहे या जागरूकता अभियानामध्ये तालुक्यातील विविध शाळांमध्ये मुलींचे अपहरणाचे गुन्हे कसे घडतात व त्याला कसा प्रतिबंध घातला जाऊ शकतो तसेच सायबर गुन्हे मोबाईलचा गैरवापर याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन करण्यात आले.
गुन्हे प्रतिबंधाच्या अभियानाचा भाग म्हणून नुकतेच सात्रळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या कडू पाटील महाविद्यालयामध्ये डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत वाचन प्रेरणा दिन निमित्त पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी रयत संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू,अक्षर मानव वाचनालयाचे संस्थापक .पंकज कडू पा.प्राचार्य.सीताराम गारुडकर, मुख्याध्यापिका सौ.विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका सौ.हेमलता साबळे ,शिक्षिका अश्विनी जाधव (कडू) तसेच शिक्षक,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर वाचन प्रेरणा दिना निमित्त शंभर पुस्तके वाचून रेकॉर्ड करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान केला.विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाबाबत त्यांच्याशी संवाद साधून हितगुज करत मार्गदर्शन करण्यात आले.
राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने अशाच प्रकारे मुस्कान दोन गुन्हे प्रतिबंध उपाय योजना अभियान राबवण्यात येणार आहे.
