संगमनेर विशाल वाकचौरे शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या प्रारंभाचे औचित्य साधत वसुबारस सणानिमित्त सामुदायिक गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद बजरंग दल,मातृशक्ती - दुर्गावाहिनी आयोजित गौ-ग्राम परिक्रमा काढण्यात आली होती.
दीपावली सारख्या प्रमुख सणाची सुरुवात गोपूजनाने करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून पाहायला मिळते.हिंदू धर्मात गोमातेचे प्रथम पूजन केल्याशिवाय कोणतेही दैवकार्य वा पितृकार्य पूर्ण होत नाही, अशी श्रद्धा आहे.
मागील वर्षी राज्य सरकारने गोमातेला ‘राजमातेचा दर्जा’ दिल्यामुळे राज्यात गोमातेचे महत्व आणखी वृद्धिंगत झाले आहे. गोमाता ही केवळ एक जनावर नसून भारतीय संस्कृतीचे प्रतीक आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानली जाते.
देशी गाईंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून,या सोहळ्याच्या माध्यमातून गोमातेचे धार्मिक,सांस्कृतिक आणि पर्यावरणीय महत्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा व गोसंवर्धनाचा संदेश देण्याचा उद्देश आहे.
गौ-ग्राम परिक्रमा सकाळी ८:०० अकोले नाका येथून सुरू झाली. शहरातील मेनरोड, बाजारपेठ प्रमुख मार्गावरून व मार्गातील प्रमुख मंदिरांसमोरून ९:०० वाजता चंद्रशेखर चौक येथील श्रीराम मंदिर येथे महाआरती होऊन गौ-ग्राम परिक्रमा पार पडली.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुभाष कोथिंबिरे,विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सचिन कानकाटे,विशाल वाकचौरे, वाल्मीक धात्रक,चिराग साहू, आदित्य गुप्ता,हेमंत खैरनार, दुर्गावाहिनीच्या ॲड.सोनाली बोटवे,जीवदया गो- शाळेचे राजेश दोषी,भाजपचे किशोर गुप्ता, साहेबराव वलवे, संपत गलांडे,सौ. रेखा गलांडे,भाजप शहराध्यक्षा सौ.पायल ताजणे, पुरोहित संघाचे भाऊ जाखडी आदींनी देशी गोवंश संगोपन करणारे राजू मीर,रघु मीर,भरत मीर,रणजीत मीर यांचा यावेळी सत्कार केला.
या पवित्र सोहळ्यास परिसरातील सर्व गोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "गौ हमारी माता है| जन्म जन्म का नाता है|" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. गोमातेचे पूजन करून तिचा आशीर्वाद सर्वांनी घेतला.
