नाशिक दिनकर गायकवाड वडाळा नाका येथे उभी केलेली महिंद्रा सवारी प्रवासी टॅक्सी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुंबई नाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शेख जुबेर कादर (रा. दीपालीनगर, हरिभक्ती अपार्टमेंट, नाशिक) हे टॅक्सीचालक आहेत. कादर यांनी नेहमीप्रमाणे वडाळा नाक्याजवळ असलेल्या कांदा-बटाटा भवन येथे टॅक्सी स्टॅण्डजवळ एक लाख रुपये किमतीची काळीपिवळी महिंद्रा सवारी प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी पार्क केली व टॅक्सी स्टॅण्डला टॅक्सीचा नंबर कितवा आहे, हे पाहण्यासाठी गेले. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने ही टॅक्सी भरदुपारी चोरून नेली.या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
