जय भवानी रोड,सय्यद मळ्यात बिबट्या नरभक्षक होण्याआधी जेरबंद

Cityline Media
0

नाशिक दिनकर गायकवाड येथील आर्टिलरी सेंटरच्या भिंतीलगत असलेल्या सय्यद मळा व चव्हाण मळा परिसरात मागील तीन महिन्यांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात नुकतेच पहाटे एक साडेतीन ते चार वर्षांचा बलदंड बिबट्या जेरबंद झाला.
                 छाया रेखांकन-प्रकाश कदम 
गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याचे फिरणे सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पंधरा दिवसांपूर्वी कुरेशा सैय्यद यांच्या नातवावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. तर दहा दिवसांपूर्वी परिसरात झाडांची छाटणी व साफसफाईसाठी आलेल्या मजुरांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने तेथील दहशत शिगेला पोहोचली होती.

याबाबतची माहिती मिळताच कुरेशा सैय्यद,विक्रम कदम,मुन्ना सैय्यद आणि सागर जाचक यांनी वनविभागाशी संपर्क साधून तातडीची कारवाई करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या सहकार्यामुळे वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी पिंजरा लावला होता.अखेर आज पहाटे त्याला यश आले. या कारवाईत वनाधिकारी अनिल अहिरराव व इतर कर्मचारी तसेच वन्यप्राणी बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुरक्षित ताब्यात घेतले.सध्या बिबट्याला वैद्यकीय तपासणीसाठी म्हसरूळ येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!