स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई
श्रीरामपूर दिपक कदम तालुक्यातील बेलापूर बुद्रुक येथील कोल्हार चौक येथे पहाटेच्या सुमारास शामभाऊ बोरुडे यांचे जागेमध्ये एम.एच.१७. ए. ए. १६०६ ट्रॅक्टर व ट्रेलर उभे केले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी किशोर असाराम बोरुडे (वय ५१ वर्षे) रा. बेलापुर बुद्रुक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गु. र. नंबर ९१२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (बी) प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी यांचे साधानाचे चोरी उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
आदेशानुसार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदिप मुरकुटे व पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख,विशाल तनपुरे, रमिझराजा आतार, भगवान थोरात चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून सदर पथकास ट्रैक्टर चोरीचे गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
हे पथक गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करत असतांना, गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा इसम भागवत निवृत्ती ताके हा त्याचे दोन साथीदारासह केला आहे. त्यावरुन पथकाने व्यवसायिक कौशल्य आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर इसमाचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नामे १) भागवत निवृत्ती ताके वय ३२ वर्षे, २) समाधान शाहुराव मिसाळ वय-३७ वर्षे दोघे रा. जेऊर हेवती ता. नेवसा ३) सिध्दांत रमेश डुकरे वय २६ वर्षे रा. चिंचोली फाटा, ता.राहरी जि.अहिल्यानगर असे सांगितले, त्यांना गुन्हयातील चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर बाबत विचारपूस केली असता, त्यांने गुन्हा केल्याची कबुली देवून, सदरचा ट्रेक्टर व ट्रेलर आरोपी भागवत ताके याचे ओळखीचे इसम नामे सुरेश चिमाजी जगदाळे रा. गणेश नगर बडगांव शेरी ता. हवेली जि पुणे याचे कोन्हाळे ता. अक्कलकोट जि. सोलापुर येथील शेतामध्ये लावले असल्याबाबत सांगितले. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जावुन सदर गुन्हयातील चोरीस गेलाला ट्रॅक्टर व ट्रेलर पंचनामा करुन, एकुण २,५०,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गु. र. नंवर ९१२/२०२५,भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (बी) प्रमाणे दाखल गुन्ह्यात ताब्यातील आरोपीस आणि चोरीस गेलेला ट्रॅक्टर व ट्रेलर असा एकुण २,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत करीत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
