कोट्टायम विशाल वाकचौरे एळिक्कुलम, कोट्टायम जिल्ह्यातील स्वयंसेवक आनंद अजी यांचा अनैसर्गिक मृत्यू अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून संघाशी जोडलेले आहे.आनंदू यांचे वडील दिवंगत अजी हे संघाचे कार्यकर्ते होते. या दुःखद आणि दुर्दैवी क्षणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत असे सह प्रांत कार्यवाह दक्षिण केरळ के.बी.श्रीकुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की आनंदू अजी यांच्या मृत्यूनंतर लगेचच इंस्टाग्राम आणि काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या कथित आत्महत्या नोटची आणि मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोट्टायम करत आहे. या नोटमध्ये संघावर काही संशयास्पद आणि निराधार आरोप करण्यात आले आहेत, जे ते आपल्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगत आहेत.
जिल्हा पोलिसांकडे दाखल केलेल्या लेखी याचिकेत,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोट्टायम सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहे.आम्हाला खात्री आहे की स्वतंत्र चौकशीमुळे त्यांच्या अपघाती मृत्यूचे खरे कारण तर समोर येईलच, पण या दुर्दैवी घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्दोषता देखील सिद्ध होईल. के.बी. श्रीकुमार यांनी म्हटले आहे.
