श्रीरामपूर विशाल वाकचौरे हिंदू संस्कृतीतील गाईच्या पूजनाचा आणि कृतज्ञतेचा दिवस म्हणून साजरा होणारा वसुबारस (गोवत्स द्वादशी) सण यंदा बेलापूर बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेलापूर-उक्कलगाव विभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२५, रोजी सायंकाळी ४.०० वाजता आझाद मैदान, बेलापूर बुद्रुक येथे भव्य गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी गोमातेचे व वासराचे पूजन करून गोरक्षक व गोसेवक आपली कृतज्ञता व्यक्त करतात. हिंदू धर्मात गाईला माता मानले गेले असून ती सात्विकतेचे प्रतीक आहे. तिच्या दुधाने समाजाला बळकटी मिळते, शेतीस खताद्वारे पोषण मिळते. त्यामुळे वसुबारस हा गोरक्षक आणि गोभक्तांसाठी श्रद्धा आणि संस्कारांचा सण मानला जातो.
या कार्यक्रमात हिंदू धर्मरक्षक नाथभक्त अशोक पालवे महाराज (श्री मायंबा सेवेकरी,अहिल्यानगर) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच कार्यक्रमास सोमनाथ वाकचौरे (अप्पर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर), किशोर अण्णा निर्मळ (संघचालक, उत्तर नगर जिल्हा),
ऋषिकेश भागवत (बजरंग दल प्रांत गोरक्ष प्रमुख पश्चिम महाराष्ट्र, मानद पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन), विशाल वाकचौरे (जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद), नितीनजी दिनकर (जिल्हाध्यक्ष, भाजप उत्तर नगर), शुभम मुर्तडक (जिल्हा संयोजक, बजरंग दल उत्तर नगर), योगेश मखाना (विशेष संपर्क प्रमुख, विश्व हिंदू परिषद), तसेच प्रखर हिंदुत्ववादी अर्जुन दाभाडे (संस्थापक,जय श्रीराम तालीम आखाडा, गोंदवणी) आणि सोनू परदेशी (श्रीराम नवमी उत्सव समिती, नेवासा) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या आयोजनात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल बेलापूर-उक्कलगाव विभागाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी होणार असून,सर्व हिंदू बांधव, भगिनी, माता आणि गोरक्षकांना या पवित्र गोपूजन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
