पाचेगाव येथे त्रिदिनी सप्ताह उत्सवाने भक्तिभावाची पर्वणी!
आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी गावच्या कर्मभूमी असलेल्या देवगड देवस्थानचे संस्थापक श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा यांच्या गुरू भगिनी, तसेच १९८२ मध्ये श्रीक्षेत्र देवगड येथील दत्त मंदिरात महिलांना प्रवेश देणाऱ्या महान बालब्रह्मचारी साध्वी पुंजामाई यांच्या जन्मभूमी पुनतगाव जुने (पाचेगाव), ता.नेवासा, पंडुरे वस्ती येथे पुंजामाई मंदिराच्या जिर्णोद्धारानंतर भव्य प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा तसेच त्रिदिनी सप्ताह उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा होत आहे.
या सोहळ्याची माहिती ह.भ.प. बालु महाराज पंडुरे यांनी दिली.भक्तिभावाचा त्रिदिनी सप्ताह कार्यक्रम:
सकाळी ६.०० – आरती
सायंकाळी ५.०० ते ६.०० हरिपाठ
रात्री ७.०० ते ९.०० – कीर्तन व प्रवचन
प्रवचनकार:
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा)
ह.भ.प. शिवशाहीर कल्याण महाराज काळे (भातकुडगाव)
ह.भ.प. बालु महाराज पंडुरे
दररोज कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
बुधवार, दि. ८ ऑक्टोबर २०२५
सकाळी ९.०० ते ११.०० – ह.भ.प. मंहत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे “काल्याचे कीर्तन”
त्यानंतर ११.३० वा. देवगड देवस्थानचे प्रमुख ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते प.पू. पुंजामाई माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व मंदिर कलशारोहण सोहळा संपन्न होईल.
हा भव्य सोहळा पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळे, तरुण मंडळे व पुंजामाई भक्त परिवारांच्या सहकार्याने पार पडत आहे.
आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांना आवाहन करण्यात आले आहे की,
या त्रिदिनी सप्ताह व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घेऊन साध्वी पुंजामाईंच्या पुण्यभूमीत उपस्थित राहावे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे.
शिवभक्त साध्वी पुंजामाईंचे जीवन व कार्य
शिवभक्त बालब्रह्मचारी प.पू. पुंजामाई यांनी आपल्या आयुष्यभर धर्मप्रसार, श्रद्धा आणि सिद्धीच्या साधनेद्वारे जनकल्याणाचे कार्य केले. त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी न घालता उदीच्या माध्यमातून व सिद्धीच्या जोरावर अबालवृद्धांना आरोग्यदान केले.
त्यांचे बकुपिंपळगाव व प्रवरासंगम येथे भव्य मंदिरे असून, आता त्यांच्या जन्मगावी पुनतगाव पाचेगाव (जुने) येथे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, त्यांच्या कर्मभूमी असलेल्या आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांच्या निधीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे ४५ लाख रुपयांचे भव्य मंदिर उभारले जात आहे.
या मंदिराचे दोन टप्पे पूर्ण झाले असून, तिसरा आणि अंतिम टप्पा लवकरच सुरू होणार आहे.
