झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील,शेतकरी चारा आणण्यासाठी शेतात गेले असता रानडुकराने शेतकऱ्यांवर हल्ला केला,तसेच शेतकऱ्यांच्या मका,पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे आहे.
रानडुकराच्या येथील बिन्धास्त वावरामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भिंती निर्माण झाली असून उभ्या पिकांचे देखील नुकसान होत आहे.
याबाबत लवकरच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे असे शेतकऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
