लोणी विशाल वाकचौरे दरवर्षी प्रमाणे उत्साहाने साजरी होणारी दिवाळी लोणी खुर्द सेवा वस्ती येथे बजरंग दलाच्या वतीने उत्साहाने साजरी करण्यात आली.लोणी खुर्द मधील सेवा वस्ती येथील गोरगरीब,अनाथ व गरजू नागरिकांना याही वर्षीची भाऊबीज निमित्ताने माता-बहीणींना साडी व मिठाई, फराळ वाटप करून दिवाळीचा आनंद साजरा करण्यात आला.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.विश्व हिंदू परिषद बजरंग दल लोणी शहर अध्यक्ष सागर राक्षे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आला.सर्वांची दिवाळी मोठ्या संख्येने व आनंदाने आपापल्या घरात साजरी होत असते परंतु या गोरगरीबांकडे कोणाचे लक्ष जात नाही म्हणून बजरंग दल नेहमी सामाजिक उपक्रम करत इतरांना प्रोत्साहन देत असते.
यावेळी उपस्थित बजरंग दलाचे जिल्हा सुरक्षा, प्रचार- प्रसार प्रमुख प्रसाद घोगरे,विठ्ठल ठोंबरे, राधाकिसन आहेर,विकी राक्षे, विलास ससाणे,अमन शेख, विशाल आव्हाड,वैभव शेलार, बाळू सातपुते, रोहीत पवार, दिपक पवार, मनोज साळवे, शुभम साळवे, गणेश साळवे, अभिषेक विर, अजय पवार, संकेत तांबे, राहुल धोत्रे, कृष्णा वाघ, अल्ताफ शेख, जलील शेख, ओमकार घोरपडे, भगत सर, सागर उबाळे, हिना उबाळे, जयप्रकाश खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमास विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री विशाल वाकचौरे, जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक यांचे मार्गदर्शन लाभले.या उपक्रमात साडी व फराळ वाटप करण्यात आले. त्यावेळी परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बजरंग दलाच्या वतीने राबविलेल्या या उपक्रमातून समाजातील एकतेचा, सेवाभावाचा आणि बांधिलकीचा उत्तम संदेश देण्यात आला आहे.
