नाशिक दिनकर गायकवाड स्वस्त धान्य दुकानात रेशन खरेदी करण्यासाठी गेलेल्या युवकाला मागील भांडणाची कुरापत काढून विटा व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना सातपूर परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की बबन पिराजी वाळके (वय ५४, रा. गंगासागरनगर, सातपूर) हे त्यांचा भाचा कृष्णा प्रकाश वाळके याच्यासमवेत प्रबुद्धनगर येथील स्वस्त धान्य दुकानात दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास खरेदी
करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आयुष अशोक पटेकर (वय २२), सार्थक सचिन गोवर्धने (वय २१),पुष्पा राज घुगे (वय २३), शुभम् नाना पानपाटील (वय २८, सर्व रा. प्रबुद्धनगर, सातपूर) यांनी मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णा वाळके याला लाकडी दांडका, विटा व धारदार हत्याराने मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध बबन वाळके यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
