भाडेतत्वावर घेतलेला बंगला बळकावला;प्रकाश लोंढेसह ५ जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड खुटवडनगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेला बंगला बळकावून तो परत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यासह पाच जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी प्रमोद मधुकर अत्तरदे यांचा खुटवडनगर परिसरात पुष्कर नावाचा बंगला आहे.या बंगल्यावर अत्तरदे यांनी त्यांच्या मयत पत्नीच्या नावावर चोलामंडलम फायनान्सकडून १ कोटी ७० लाख रुपये कर्ज घेतले होते. सन २०२१ मध्ये अत्तरदे यांना हा बंगला भाडेतत्त्वावर द्यायचा होता. याची संधी साधून आरोपी सुनील साखरे याने अत्तरदे यांची प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व भूषण लोंढे यांच्याशी भेट घालून दिली. त्यावेळी अत्तरदे

आणि लोंढे यांच्यात १५ हजार रुपये प्रति महिना भाडे करारावर पुष्कर बंगला देण्याचे ठरले. आरोपींनी मात्र अत्तरदे यांना भाडे करारनामा करून दिला नाही आणि बंगल्याचा ताबा घेतला. प्रकाश लोंढे यांनी नंतर या जागेवर आपले कार्यालय सुरू केले. लोंढे यांना याचा जाब विचारला असता लोंढे यांनी अत्तरदे यांना शिवीगाळ व दमदाटी करून बाहेर काढून दिले.

चोलामंडलमचे कर्मचारी बंगल्याचा ताबा घेणे घेण्यासाठी आले असता लोंढे यांनी अत्तरदे यांना बोलावून तूम्ही आता बंगला विसरून जा,तुम्ही आम्हाला ओळखत नसाल तर आमची माहिती घ्या असे सांगून अशी दमदाटी केली. सप्टेंबर २०२५ मध्ये अत्तरदे यांना समजले की, त्यांच्या बंगल्यात आरोपी सुनील विठ्ठलकर व निखिल निकुंभ हे त्यांच्या परिवारासह राहत आहेत.अत्तरदे तिथे गेले असता सनी आणि

निखिल यांनी आमचे बॉस प्रकाश लोंढे यांचा आदेश आहे की दोन कोटी रुपये दिले तरच बंगला खाली करू नाहीतर विसरून जा अशी दमदाटी करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे अत्तरदे हे प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व भूषण लोंढे यांना भेटले असता त्यांनी तुम्ही तुमच्या बंगला विसरून जा,आमच्यावर बरेच पोलीस केसेस आहेत. तुम्ही आमच्या फांद्यात पडू नका. बंगला गेलाच आहे, 
विनाकारण जीवही गमवून बसाल असे सांगून अत्तरदे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर भूषण लोंढे यांनी अत्तर त्यांना धक्काबुक्की करून घराबाहेर हाकलून दिले

या प्रकरणी अत्तरदे यांच्या फिर्यादीवरुन वरील सर्व आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!