संगमनेर नितीनचंद्र भालेराव कवी,गायक हरिचंद्र भालेराव यांच्या मातोश्री पार्वताबाई भालेराव यांचे वृद्ध काळाने निधन झाले.
हरिचंद्र भालेराव यांनी कविता व गाण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जनजागृती करत आंबेडकर चळवळीसाठी योगदान दिले आहे. पार्वताबाई भालेराव यांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव,मास्टर रघुवीर खेडकर,
राजहंस दूध संघाचे संचालक डॉक्टर प्रमोद पावसे,भाजपा मा.तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,सरपंच सुभाष गडाख,संगमनेर भाजपाचे सरचिटणीस गणेश दवंगे,मास्टर विलास कुमार( राज) गायकवाड देवठाणकर सह सौ.शेषकन्या पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र संगमनेर,भारत नागपूरकर,
सविता पुणेकर,सुनील औरंगाबादकर,यांच्या सह लोककला क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
पार्वताबाई यांचा जन्म पोखरी बाळेश्वर या ठिकाणी झाला.त्यांचा स्वभाव शांत,संयमी होता.हिवरगांव पावसा येथील केशव सावळेराम भालेराव यांच्या बरोबर विवाह झाला.हे दोघे पती पत्नी अगदी सुस्वाभावी,
समजदार होते. त्यामुळे केशव व पार्वताबाई यांनी आलेल्या अडचणीवर मात करत संसाराचा गाडा व्यवस्थित चालू लागला.
त्यांना सरस्वतीबाई आणि मुलगा हरिचंद्र या दोन मुलांमुळे संसारात आनंदाचा रंग भरला.हे दोन्ही मुले प्रेमळ आणि संस्कारी,सुस्वभावी आहेत.आई पार्वतीबाई व वडील केशव भालेराव यांनी शेतामध्ये कष्ट व मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.आपल्या मुलाचा सांभाळ केला.त्यांना शिस्त आणि संस्काराने घडविले.
त्यांना उच्च शिक्षण देऊन पायावर उभे केले.मुलगी सरस्वतीबाई ही हनुमंतगावमध्ये ब्राह्मणे कुटुंबाचा आधारस्तंभ बनली आहे.मुलगा हरिचंद्र के.सी.कॉलेज चर्चगेट मुंबई येथे ३७ वर्ष नोकरी करून सेवानिवृत्त झाला आहे.हरिचंद्र कवी गायक म्हणून प्रसिद्ध आहे.
लहानपणापासून हरिचंद्र गाणे, लावण्या ,पोवाडे,भजने म्हणण्याची आवड जोपासली आहे.त्यांच्या सुंदर,पहाडी आवाजाने रसिक मंत्रमुग्ध होतात.शालेय व महाविद्यालयीन जीवनात नाटक,गाणे सांस्कृतिक कार्यक्रम यात मोठा सहभाग राहिला आहे.
के.सी.कॉलेजला नोकरी करत असताना कविता व गाण्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जनजागृती करत आंबेडकर चळवळीसाठी योगदान दिले आहे. सेवानिवृत्तीनंतरही आज हिवरगाव पावसा आपल्या मायभूमीत येऊन ते कलेच्या माध्यमातून जनजागृती समाज प्रबोधन करत असताना.पत्नी पुष्पा यांची मोलाचे साथ मिळाली आहे.
हरीचंद्र व पुष्पा यांनी आई पार्वतीबाई भालेराव यांची वृद्धापकाळात सेवा केली.९० व्या वर्षी पार्वताबाई यांचे वृद्धापकाळाने १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा हरीचंद्र, मुलगी सरस्वती,सुन पुष्पा,
नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने हिवरगाव पावसा पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
