आश्वी संजय गायकवाड भगवान बुद्ध यांचे सामाजिक संघटन बाबतचे विचार समता,अहिंसा,करुणा आणि नैतिकतेवर आधारित होते. त्यांनी जातीप्रथा, भेदभाव आणि अन्याय यांना विरोध करून सर्व मानवांना समान मानले. त्यांनी स्थापन केलेला संघ हा सामाजिक समतेचा आणि लोकशाही मूल्यांचा आदर्श होता.त्यांच्या शिकवणी आजही सामाजिक सुसंघटित समाजाच्या निर्मितीसाठी प्रासंगिक आहेत असे प्रतिपादन अनिल मुन्तोडे यांनी केले.
पुढे बोलताना मुन्तोडे म्हणाले की देशातील लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत क्रांतिकारी परिवर्तन करणारी शासन प्रणाली ही लोकशाही शासन प्रणाली आहे. लोकशाहीच्या संवर्धनासाठी सुसंघटित समाजव्यवस्था आवश्यक आहे. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या ग्रामशाखा या लोकशाही संवर्धनाचे केंद्र असल्याचे सांगितले. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या शिबलापूर शाखा उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पवार यांनी अभ्यासिकेचे लोकार्पण केले.जिल्हाध्यक्ष शांताराम रणशूर यांनी शाखा फलकाचे अनावरण करून उपस्थितांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. तालुका सरचिटणीस राजू मुन्तोडे यांनी बौद्ध पूजापाठ करून वातावरण मंगलमय केले.संगमनेर तालुका प्रभारी विश्वास जमधडे,कोपरगाव तालुका प्रभारी बिपीन गायकवाड व विजय जगताप यांनी ग्रामस्थांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
यावेळी संजय मुन्तोडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यानेच सामाजिक उन्नती साधता येईल.संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी धम्म ध्वजारोहण व ग्रामशाखा पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा केली.
संदीप मुन्तोडे(अध्यक्ष),अजित मुन्तोडे (सरचिटणीस),सुशांत मुन्तोडे,(कोषाध्यक्ष),सतिष मुन्तोडे,उपाध्यक्ष (संस्कार विभाग),संभाजी मुन्तोडे,(उपाध्यक्ष, संरक्षण विभाग),रविंद्र मुन्तोडे(सचिव, संस्कार विभाग, गौतम मुन्तोडे(सचिव, संरक्षण विभाग),
मच्छिंद्र मुन्तोडे, (हिशोब तपासणीस) संघटक पदी,रोहिदास मुन्तोडे,अनिल मुन्तोडे,अनिल मुन्तोडे,वैभव दुशिंग,विशाल मुन्तोडे,अक्षय मुन्तोडे,सागर मुन्तोडे,संजय मुन्तोडे,अतुल मुन्तोडे,रविंद्र मुन्तोडे,प्रितम मुन्तोडे,तेजस मुन्तोडे,कार्तिक मुन्तोडे,किरण आढाव,विजय मुन्तोडे,श्रीकांत मुन्तोडे,सागर गायकवाड,अण्णासाहेब मुन्तोडे,करण मुन्तोडे,दिपक मुन्तोडे,निखिल मुन्तोडे,प्रशांत मुन्तोडे,अजय मुन्तोडे,महेश मुन्तोडे,संजय तबाजी मुन्तोडे यांची संघटकपदी तसेच अंबादास मुन्तोडे,सेवानिवृत्त सनदी अधिकारी ,यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली.
सर्व परिसर यावेळी फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता.संगमनेर शहराध्यक्ष विनय घोसाळे,सरचिटणीस सचिन साळवे मा.जिल्हाध्यक्ष यमदास मुन्तोडे,अशोक मुन्तोडे,आश्वी शाखाप्रमुख दत्तराज मुन्तोडे,माळेवाडी शाखाप्रमुख सचिन मुन्तोडे,महिला शाखा उपाध्यक्ष शकुंतला जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शांताराम रणशूर यांनी शाखा फलकाचे अनावरण केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप मुन्तोडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी अशोक गायकवाड होते.सूत्रसंचालन अजित मुन्तोडे यांनी केले.उद्घाटन प्रसंगी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जोरदार घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करुन महिला पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. राजू मुन्तोडे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम सांगते प्रसंगी भोजनदान करण्यात आले.
