लाभार्थ्याचे ग्रामपंचायत समोर तीन दिवसापासून अमरण उपोषण सुरू
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील
झरेकाठी येथील अनिल दत्तात्रय आहेर यांना व त्यांच्या आई श्रीमती लिलाबाई दत्तात्रय आहेर यांच्या नावावर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२४ -२५ मधील घरकुल मंजूर असून देखील ग्रामपंचायत कार्यालयाच्या आडमुठे धोरणामुळे संबंधित लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी मिळाली नाही.
अनिल दत्तात्रय आहेर हे उपोषणासाठी बसलेले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस असून आज उपोषण स्थळी आश्वी पोलीस ठाण्याच्या पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली असता. प्रसंगी गावचे कामगार पोलीस पाटील सुदाम वाणी हे उपस्थित होते.
यासंदर्भात ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे.चौकशी केली असता त्यांच्याकडून असे सांगण्यात आले की
जे घरकुल लाभार्थी आहेत परंतु ते भूमिहीन आहेत त्यांनाच घरकुला साठी जागा देण्यात येते
ज्या घरकुल लाभार्थ्यांना जमीन आहे त्यांना घरकुलासाठी जागा देण्यात येत नाही असे स्पष्ट करण्यात आले.
