नाशिक दिनकर गायकवाड नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्ते, जोडरस्ते तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मार्गांवरील खड्डे भरण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणावर वेग देण्यात आला आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांच्या निर्देशानुसार सर्व विभागीय अधिकाऱ्यांना व कार्यकारी अभियंत्यांना तत्परतेने काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे नाशिक महानगर पालिकेचे प्राधान्य ठरले आहे.
नाशिक पूर्व विभागात, प्रभाग क्र. १५ मधील जनरल वैद्य नगर परिसर तसेच नंदिनी नदी रस्त्या लगतचे खड्डे दुरुस्त करण्यात आले असून, येथील वाहतूक आता सुरळीत सुरू आहे. याशिवाय वडाळा-पाथर्डी रोडवरील पापामिया फार्म परिसरात डीबीएम काम तंत्राने दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत सुरू झाली आहे.
पश्चिम विभागातील वेस्टसाइड मॉल,येवलेकर मार्ग रस्त्या लगतचे खड्डे दुरुस्त करण्यात आले आहे. पंचवटी विभागात खड्डेमुक्ती मोहिमे अंतर्गत प्रभाग क्र. ६ मधील आसारामबापू पूल ते शासकीय
रोपवाटिका पूल या रस्त्यावरील सर्व खड्डे व पॅचेस भरण्यात आले आहे. नव्या थराचे डांबरीकरण (एमपीएम काम) पूर्ण झाले आहे. तसेच प्रभाग क्र. २ मधील गोदावरी लॉन्स जवळील शाळेला लागून असलेल्या रस्त्यावरील खड्यांचे भरणेही पूर्ण करण्यात आले आहे.
सातपुर विभागातील महादेव मंदिर, राजेश्वरी चौक, श्रमिकनगर रस्त्यालगतचे खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. नाशिकरोड विभागातील जेलरोड दसक येथील देवी मंदिराच्या मागील रस्ता पश्चिमेकडे सहाशे मिटरवर पॅच वर्क झालेले आहे, पण त्याच्या पुढे डाव्या बाजूला वळण रस्ता आहे, तिथेच रस्त्याला खड्डेपडून तो फक्त खडीने बुजावला आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची गती वाढवण्यासाठी
लवकरात लवकर हे खड्डे दुरुस्तीसाठी महानगर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे.
