अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भीमसैनिक महामोर्चात सामील होणार
संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बौध्दांचे जागतिक दर्जाचे सर्वोच्च श्रध्दास्थान आहे.महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात आलेच पाहिजे.महाबोधी महाविहाराच्या ट्रस्ट बाबत सन ब्रिटिशकालीन कायदा रद्द करण्यासाठी मुंबईत येत्या १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिच्या वतीने सर्व रिपब्लिकन गट,सर्व पक्षीय बौध्द नेते,बौद्ध संघटनाच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व गटतट विसरुन सर्व आंबेडकरी बौध्द जनतेने लाखोंच्या संख्येने सामील व्हावे.बौध्दांनी या शांततापूर्ण विराट मोर्चात आपली ताकद दाखवावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी केले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट व सर्व पक्षीय बौद्ध नेते,पूज्यनीय भिक्खु संघ.सर्व बौद्ध संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान येथुन महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व गटांचे पदाधिकारी मोठी मेहनत घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )यांची महा मोर्चाच्या नियोजना संदर्भात दक्षिण मध्य मुंबई व ईशान्य मुंबई पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सदर बैठकीत मार्गदर्शन करताना प्रदेश उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव म्हणाले की महाबोधी विहार मुक्ती बौद्ध बांधवांनी एकेची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे.सर्वांनी गट तट विसरून महाबोधी विहारासाठी एकत्र येऊन महामोर्चा यशस्वी केला पाहिजे.तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या महामोर्चात सामील होणार असल्याचे माहिती दिली.
