आश्वी प्रतिनिधी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील जुन्या पिढीतील धार्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या विडी कामगार,शेती आणि कौटुंबिक कामामध्ये पारंगत एकत्रित कुटुंब पद्धतीतून आदर्श व शिक्षित कुटुंब बनविणाऱ्या हिराबाई बाजीराव शिंदे यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले.
मृत्यु समयी त्यांचे वय ८१ वर्ष होते त्यांच्या पश्चात तीन मुले, सूना, दोन मुली,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे संगमनेर येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले जेष्ठ शिक्षक व पत्रकार किशोर शिंदे ,प्रगतशिल
शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, वनीकरण विभागात कार्यरत सतीश शिंदे यांच्या त्या मातोश्री होत तर उंबरी बाळापुरचे जेष्ठ पत्रकार सुरेश थोरात यांच्या त्या मावशी होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
