सोनई मातंग युवक संजय वैरागर अमानवी मारहाण प्रकरणी जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाकडून निषेध

Cityline Media
0
कारवाईच्या मागणीचे संगमनेर प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर 

संगमनेर प्नतिनिधी नेवासा तालुक्यातील सोनई गावातील संजय वैरागर या मातंग समाजातील २२ वर्षीय तरुणास जात्यांध मानसिकतेतून गाव गुंडांनी अमाननीय कृत्य करून अमानुषपणे मारहाण केली या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले तर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणात सांगितले की मांतगांची हिंदूत्वाची वज्रमूठ उघडली आणि त्यातूनच हा हल्ला झाला समाजाने आपल्या शत्रुला ओळखले पाहिजे.
या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नुकतेच संगमनेर उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करून तीव्र असा निषेध व्यक्त केला या आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करून समाजाला न्याय द्यावा तसेच अहिल्यानगर जिल्हा हा दलित अत्याचार ग्रस्त जाहीर करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
प्रसंगी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव,जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे,जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस शशिकांत थोरात, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ गायकवाड,तालुकाध्यक्ष अशोक शेळके,

तालुका काँग्रेस प्रवक्ते तुकाराम भोसले,तालुका कार्याध्यक्ष दगडू साळवे संगमनेर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनु गायकवाड, सचिन साळवे,जिल्हा सोशल मीडिया काँग्रेसचे समन्वयक उदय अभंग, जिल्हा सरचिटणीस नितीन साळवे,जिल्हा काँग्रेसचे विनोद गायकवाड,प्रवीण आव्हाड, सचिन गायकवाड,शहाजी पवार, भागवत आव्हाड,लक्ष्मण गायकवाड,श्रवण गायकवाड, 
 आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!