शाहू,फुले,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला सत्कार
संगमनेर प्नतिनिधी शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संदेश आढाव यांचे चिरंजीव दर्शन आढाव यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भारत सरकार पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील समग्र शाहू,फुले, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने संयुक्तिक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार समारंभात डॉ. जयश्री थोरात,शिक्षक नेते हिरालाल पगडाल,जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सोनू गायकवाड,आंबेडकर चळवळीचे नेते विनोद गायकवाड, इंजि. प्रशांत गायकवाड, संगमनेर मर्चंट
बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे,जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुण गावित्रे, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ गायकवाड, शिवसेनेचे सचिन साळवे,वंचित बहुजन आघाडीचे वैभव मोकळ, समाजरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त विश्वनाथ आल्हाट ,
भारतीय बौद्ध महासभेचे संगमनेर शहर प्रमुख विनय घोसाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत थोरात, उद्योजक बाळासाहेब बालोडे, उत्तम पाळंदे , उद्योजक सुनील रुपवते, ॲड.रमेश बनसोडे साहेब, ॲड.माघाडे , बौद्धाचार्य रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राजेंद्र घायवट,रामोशी रामोशी समाजाचे नेते संजय चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे बाबासाहेब कदम,काँग्रेसचे श्रावण गायकवाड, सत्कारमुर्ती दर्शन यांचे बंधू प्रसाद आढाव, परी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दर्शन आढाव यांच्या यशाबद्दल त्यांचे वडील संदेश आढाव आणि आई अनिता आढाव यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
