स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगरची कारवाई.
अहिल्यानगर प्रतिनिधी शहरातील नेप्ती नाका परिसरात घरगुती गॅस टाक्यातून अवैधरित्या वाहनांमध्ये रिफिलिंग होत असल्याची कुणकुण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरण कबाडी यांना खबऱ्या मार्फत, मिळाली.
प्राप्त माहितीनुसार एक इसम अहिल्यानगर शहरातील नेप्ती नाका ते आयुर्वेद कॉर्नर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील बैरागी वॉसिंग सेंटरचे पाठीमागे मोकळ्या जागेत शेडच्या आडोशाला घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगुन गॅस विना परवाना चोरुन विक्री करत करत आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाली पोलिस निरिक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक दिपक मेढे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, गणेश लबडे,बाळासाहेब नागरगोजे,रमिजराजा आत्तार, अमृत आढाव अशांचे पथक नेमुन प्राप्त माहितीनुसार तिथे जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने तात्काळ एक इसम घरगुती गॅस टाक्या वाहनामध्ये रिफिलिंग करण्यासाठी स्वतःच्या कब्जात बाळगतांना दिसुन आला. पथकाची खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकुन इसमास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सतिश आनंद टेकाळे (वय- 32) रा. नालेगांव, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.
सदर इसमास मिळुन आलेल्या घरगुती गॅस टाक्या वापर व त्याचे परवान्याबाबत विचारपुस करता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगुन सदर गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात
बाळगुन त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरत असल्याचे सांगितले.पथकाने घटना ठिकाणचा पंचासमक्ष पंचनामा करुन १०,००० रुपये कि.ची एक इलेक्ट्रीक मोटार त्यास गॅस रिप्लींग करीता लागणारे पाईप,४००० रुपये किमतीचा एक इलेक्ट्रीक वजन काटा, १८४५० रुपये कि.चे एच.पी.,इडियन व भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या ९ रिकाम्या गॅस टाक्या,असा एकुण ३२,४५०- रुपये किमतीची मुद्देमाल ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता, इडियन,भारत व एच.पी.गॅस कंपनीच्या गॅस टाक्या स्वतःचे आर्थिक फायद्या करीता कब्जात बाळगुन त्यामधील गॅस वाहनांमध्ये भरतांना ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे
व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने ठेवुन,आपले कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गु.र.नं. ९८५/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १२५,२८७ , २८८ सह जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास कोतवाली पोलीस ठाणे करीत आहे.
