मुंबई सिटीलाईन न्यूज नेटवर्क रुबिक्स क्यूब सॉल्विंग मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केलेल्या मास्टर अफ्फान कुट्टी यांनी नुकतीच शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली.
ठाणे येथील रहिवासी असलेल्या अफ्फान यांनी केवळ रुबिक्स क्यूबच्या सहाय्याने मंत्री यांचे नाव असलेली अप्रतिम कलाकृती तयार केली.त्याहूनही आश्चर्यकारक म्हणजे,अफ्फान यांनी रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून हुबेहूब प्रतिकृती असलेली आकर्षक फोटोफ्रेम देखील तयार केली!
