नेवासा प्रतिनिधी तालुक्यातील हंडीनिमगाव येथे नुकतेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नेवासा तालुका क्रीडा समिती व रोझलॅन्ड इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल हंडीनिमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल मध्ये करण्यात आले होते.
स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कं.भेडा येथील कार्यकारी अभियंता शंतनू सुर्यकर रोझलॅन्ड स्कूलचे अध्यक्ष भाऊसाहेब अंबाडे, क्रीडा समिती अध्यक्ष. पाटील तुवर, क्रीडा, नारायण कडू, बच्चू बोरकर, बापू गायकवाड, संजय राजगुरू, प्राचार्य मॅथ्यू येवले, उपप्राचार्य पिटर बारगळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
मंचावर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार शॉल,श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन रोझलॅन्ड स्कूलच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी नेवासा तालुक्यातील विविध शाळेतील क्रिडा शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षक प्रतिनिधी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खो-खो स्पर्धेसाठी १४ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुले एकूण २५ संघ वेगवेगळ्या स्कूल मधून आले होते. स्पर्धेचे आयोजन रोझलॅन्ड इंटरनॅशनल स्कूल हंडीनिमगावच्या वतीने उत्कृष्ट पध्दतीने करण्यात आले होते. सर्व विजयी संघांना पाहुण्यांच्या शुभहस्ते रोझलॅन्ड स्कूलचे सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. पिटर बारगळ यांनी केले तर प्रास्ताविक व आभार श्री. पाटील तुवर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोझलॅन्ड चे क्रिडा शिक्षक श्री. सोनटक्के, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी फार परिश्रम घेतले.
