अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची नेवासा तालुक्यामध्ये मोठी कारवाई.
नेवासा प्नतिनिधी दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तालुक्यातील भानस हिवरे येथील आरोपीकडुन ४५० गोण्या तांदळासह ११,२५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, करण्यात करण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले या कारवाईने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरिक्षक राजेंद्र वाघ,
पोलीस अंमलदार संतोष खैरे, रमिझराजा अत्तार, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेत कारवाई करणे कामी पथकास रवाना केले.नुकतेच हे पथक नेवासा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना
पथकास गोपनिय माहिती मिळाली की, तालुक्यातील भानसहिवरे इसम नामे संदिप सुभाष शिंदे रा. भानसहिवरे याने करंजगाव येथील भगवान पुंड तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकादार यांचेकडुन विनापरवाना रेशनिंगाचा तांदुळ खरेदी करुन सदरचा तांदुळ हा संभाजीनगर येथील संजय अग्रवाल गजानन ॲग्रो करोडी येथे विक्री करण्याकरीता त्याचे भानसहिवरे गावातील गोडावुनमध्ये साठवणुक करुन ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली.
पथकाने मिळालेल्या माहितीवरुन नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार तसेच पंचासमक्ष भानसहिवरे येथील संदिप सुभाष शिंदे याचे गोडावुनची माहिती काढुन सदर गोडावुन येथे जावुन खात्री करता गोडावुनमध्ये एक इसम बसलेला दिसला.
सदर इसमास त्याचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नांव संदीप सुभाष शिंदे ,(वय - ३५ )वर्षे रा. भानसहिवरे ता. नेवासा, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे गोडावुनचे मालकाबाबत विचारपुस करता त्याने सदरचे गोडावुन हे त्याचे मालकीचे असल्याचे सांगितले.
पथकाने सदर गोडावुनची पंचासमक्ष पाहणी करता सदर गोडावुनमध्ये असलेल्या गोण्यामध्ये तांदुळ असल्याचे दिसुन आले. सदर मिळुन आलेल्या तांदुळ बाबत त्याचेकडे विचारपुस करता त्याने सदरचा तांदुळ हा रेशनिंगचा असुन तो इसम नामे भगवान पुंड रा. करजगांव ता. नेवासा, जि. अहिल्यानगर याचेकडुन तसेच आजुबाजुचे रेशनिंग दुकानदार यांचेकडुन काळ्या बाजार मध्ये खरेदी करुन संजय अग्रवाल गजानन ॲग्रो करोडी संभाजीगनर यास विक्री करण्यासाठी घेतलेला असल्याचे कळविले.
पंचासमक्ष सदर गोडावुनची पाहणी केली असता त्यामध्ये ४५० गोण्यामध्ये एकुण २२,५०० किलो तांदुळ असा एकुण २२,२५,०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन त्याचेविरुध्द पोकॉ/२५२० प्रकाश नवनाथ मांडग स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ८९९/२०२५ जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांनी केली आहे.
