स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची गुजरात राज्यात कारवाई.
अहिल्यानगर प्रतिनिधी श्रीगोंदा तालुक्यामधुन तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी वय - १७ वर्षे,हिस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाकरीता पळवुन नेले आहे.सदर घटनेबाबत बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं.२४७ /२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अपहरण झालेली मुलगी मिळुन येत नसल्याने मुलीचे नातेवाईक पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी उपोषणाकरीता बसले होतो.जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेवुन मुलीचा तात्काळ शोध घेणार असलेबाबत नातेवाईकांना आश्वासित केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेस अपहरण झालेल्या मुलीचा तात्काळ शोध घेवुन अपहरण करणारे आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले.
या आदेशानुसार पोलिस निरीक्षक किरण कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरिक्षक दिपक मेढे,पोलीस अंमलदार राहुल द्वारके,रिचर्ड गायकवाड़,सोमनाथ झांबरे, महिला पोलीस अंमलदार सोनाली भागवत यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणेकामी पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.
पोलीस पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देवुन तसेच मुलीचे नातेवाईकांकडे विचारपुस केली व तांत्रिक माहिती तसेच व्यवसायीक कौशल्याचे आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा अपहरण केलेल्या मुलीसह गुजरात राज्यामध्ये पळुन गेलेला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने सुरत,गुजरात या ठिकाणी जावुन आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती काढुन निलेश उर्फ सोन्या अशोक सावंत वय (२९ वर्षे), रा. चिंभळी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यास व अपहरण झालेली मुलगी वय १७ वर्षे यांना सुरत,गुजरात या ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपीस व अल्पवयीन मुलगी यांना बेलवंडी पोलीस ठाणे गु.र.नं. २४७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे गुन्ह्याचे पुढील तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाणे हे करीत आहेत.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
