सराईत सोनसाखळी चोराकडून मुद्देमालासह मोटरसायकल जप्त

Cityline Media
0
तोफखाना पोलीस ठाण्याची कामगिरी.

अहिल्यानगर प्रतिनिधी शहरात दिवसेंदिवस सोन साखळी चोरांची प्रमाण वाढत असून येथील फिर्यादी सौ.लिलाबाई गोरख सायकड, वय ६६ वर्षे, धंदा गृहिणी, रा.आसरा सोसायटी, गुलमोहर रोड या नुकत्याच सकाळी साडेसात वाजता एकविरा चौक,ते पारिजात चौकाकडे जाणा-या रोडवर सिध्देश्वर कॉलनी येथे सकाळीचा व्यायाम करुन करुन घरी जात असताना दोन अनोळखी इसम हे मोपेड मोटार सायकलवर येवून त्यातील एकाने फिर्यादीचे गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसका मारुन ओढुन तोडुन त्याच्याकडील मोटार सायकलवर पळुन गेले फिर्यादीवरुन याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा रजि नं. ९६८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४) ३ (५) प्रमाणे दि.२५/०९/२०२५ रोजी १३/०३ वा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना गुन्ह्याचा सखोल तपास करणेबाबत आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तात्काळ घटना ठिकाणी जावुन पाहाणी करुन गोपनिय बातमीदार यांना माहिती देवून गुन्ह्याचे चक्रे फिरवले.
हा गुन्हा हा सराईत सोनसाखळी चोर किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे,(वय २५ वर्षे) रा.नागापुर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र महेश बाबासाहेब आरु रा. नागापुर, याच्यासोबत केल्याची कबुली देवुन नमुद गुन्ह्यातील चोरी गेलेला १,२०,०००/- रु किं.चे १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल व ६०,०००/- रु कि.ची एक मोपेड मोटार सायकल असा एकुण १,८०,०००/- रु किं.चा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आली आहे.

आरोपी किरण उर्फ कुबड्या दशरथ पालवे याचेवर आज पावेतो दाखल गुन्ह्याची माहिती 
अ.क पोलीस ठाण्याचे नाव
गु.रजि नं. कलम
१)एम.आय.डी.सी.पो.ठाणे अहिल्यानगर २५८/२०२१, भा.दं.वि.क ३०७ वगैरे

२) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
२६२/२०२०, म.पो.का. कलम १२२ प्रमाणे.
३) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
५४७/२०१५, म.जु.का. कलम १२ (अ) प्रमाणे.
४)एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
७३४/२०२९, भा.दं.वि.क ३७९ प्रमाणे.

५) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
६९७/२०२०, भा.दं.वि.क ३२६ वगैरे.
६) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
१७८/२०२२, भा.दं.वि.क ३०७ वगैरे.
७) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
०१/२०२१, म.पो.का. कलम १२२ प्रमाणे.

८) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
७२४/२०१८, भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे.
९) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
२४०/२०१९, भा.दं.वि.क ३२३ वगैरे,
१०) एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
८१३/२०२५, भा. न्याय. सं. कलम ३०९ (४) वगैरे.१९
एम.आय.डी.सी.पो.स्टे, अहिल्यानगर
५५४/२०२१, मु.दारु.का. कलम ६५ (ई)

१२) कोतवाली पो.स्टे, अहिल्यानगर,
६९५/२०१९, भा.दं.वि.क ३५३,२२४ वगैरे.
१३) गेवराई पो.ठाणे, बीड
५८६/२०२५, भा.न्या. संहिता कलम ३०४ (४) प्रमाणे.
१४) तोफखाना पो.स्टे, अहिल्यानगर,
८१३/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्म,उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे,नगर शहर विभाग,अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,आनंद कोकरे यांच्या 

गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पो.हे.कों सुनिल चव्हाण,नितिन उगलमुगले,भानुदास खेडकर,योगेश चव्हाण,अब्दुल इनामदार,सुरज वाबळे,सुधीर खाडे, पो.कों सुमित गवळी, अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन,बाळासाहेब भापसे,भागवत बांगर, सुजय हिवाळे,दादासाहेब रोहकले सर्व नेमणुक तोफखाना पोलीस ठाणे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!