सोनसाखळी चोरीचा गुन्हा उघड करून सोन्याचा मुद्देमाल व मोटर सायकल हस्तगत

Cityline Media
0
शिर्डी पोलीस ठाण्याची कामगिरी

शिर्डी प्रतिनिधी अंतराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबाच्या शिर्डी येथे नुकतेच साडेदहा साईबाबा आश्रम जवळ आंध्रप्रदेश येथील महिला ही श्री साई बाबांचे दर्शनासाठी आलेली असताना अज्ञात आरोपींनी तिचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र व चैन पाठीमागून ओढली होती त्यात चैन व मंगळसुत्र तुटून काही भाग आरोपीच्या हातात व काही भाग महिलेल्या हातात आला,आरोपी सोन्याची साखळी घेवून पसार झाले होते.सदरचा प्रकार हा चैन ओढण्यासाठी एक आरोपी व त्यास सहाय्य करण्यासाठी दोन आरोपी मोटार सायकलवर थांबलेले होते असे फिर्यादी महिलेचे सांगणे होते.
त्या अनुषंगाने गुन्ह्याचे तपासात शिर्डी पोलीसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना निष्पन्न करून त्यांना नुकतेच ताब्यात घेवून त्यांची फिर्यादीकडून ओळख पटवुन घेवून गुन्ह्यात अटक केली आहे व गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल ५०,००० रु किं.ची ५ ग्रॅम सोन्याची चैन व गुन्ह्यात वापरलेली टीव्हीएस रायडर मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्यात निष्पन्न झालेले आरोपी १) रोहित बंडू खरात वय २८ रा.आंबेडकरवाडी, नाशिक (२) सुरज अमोल पोटे वय २६ रा. भोजडे ता. कोपरगांव (३) सुजित देवीदास शेरे वय ३२ रा. वाघवस्ती, शिर्डी ता. राहाता असे आहेत.

अशाप्रकारे सोन साखळी चोरीचा घडलेला गुन्हा शिर्डी पोलिसांनी अथक प्रयत्नाअंती तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करून चोरलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल हस्तगत केली आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी रोहित बंडू खरात हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हे नोंद आहेत.

अ.क्र. पोलीस ठाणे
गु.र.नं व कलम .राहाता ४०/२०१७ भा.दं.वि.क.३९५.३९४
. शिर्डी ६६/२०१८ भा.दं.वि.क.३९९,४०२
. कोपरगांव शहर २९४/२०२१ भा.दं.वि.क.३२५,३२४
४. शिर्डी २९६/२०२१ भा.दं.वि.क. ३०२,३४ सह अ.जा.ज.अ.प्र.का.क.३ (२-५)
५. शिर्डी ८०४/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०९ (४),३(५)
६. शिर्डी ९०९/२०२५ भारतीय न्याय संहिता ३०९ (४).३ (५)

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग अमोल भारती,यांचे मार्गदर्शनाखाली रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस ठाणे व त्यांचे पथक पोलीस उप निरीक्षक सागर काळे,पोकों केवलसिंग राजपुत, प्रसाद सुर्यवंशी,विकी त्रिभुवन,आकाश चव्हाण व उत्तर मोबाईल सेल श्रीरामपुर येथील सचिन धनाड,रामेश्वर वेताळ यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!