संगमनेर प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले मृत्यू समयी ते ६७ वर्षाचे होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.शिवाजी कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली.ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय होते.त्यांनी २००९ ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढली.
या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता.त्यानंतर पुन्हा २०१४ ला राहुरी मतदारसंघातून विजय मिळवला होता. २००९ ते २०१४ असे सलग दोन पंचवार्षिक त्यांनी राहुरीचे विधानसभेत नेतृत्व केले होते.
२०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा पराभव करत केला.मात्र २०२४च्या निवडणुकीत या पराभवाची परत फेड करत कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरेंना पराभवाची धूळ चारली.
आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे.अनेकदा आमदार, राज्यमंत्री,अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आदी विविध पदांवर त्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील.आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी मतदार संघ व नगर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
