बनावट लेटर पॅड,शिक्के सह्या करून श्री‌.गजानन महाराज कारखान्याची लाखो रुपयांची फसवणूक

Cityline Media
0
महसूल अधिकाऱ्यांकडून घारगाव पोलीस ठाण्यात वाहतूक ठेकेदारावर गुन्हा दाखल 

आश्‍वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील श्री गजानन महाराज शुगर लि. (युटेक) कारखान्याची बीड जिल्ह्यातील वाहतूक ठेकेदार किरण नरवडे यांनी मोठी आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महसूल अधिकारी अशोक सुरवसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापुर येथील श्री गजानन महाराज शुगर लि.या साखर कारखान्यामध्ये ऊस वाहतुक ठेकेदार म्हणून किरण अशोक नरवडे (रा.धामणगाव ता.आष्टी, जि. बीड) यांनी कारखान्या सोबत दि. २६ ऑगस्ट २०२३ रोजी ऊस वाहतूक करारनामा करून कारखान्याकडून आगाऊ रक्कम म्हणुन ४ लाख रुपये उचल घेतली.यावेळी नरवडे यांनी त्यांचे वडीलाच्या नावे असलेल्या शेत जमीनीवर कारखान्याचे नावाने आठ लाख रूपये बोजा चढवला. 

त्यानंतर २५ फेब्रु.२०२५ रोजी किरण नरवडे याने कार्यालयात येऊन युटेक शुगर लिमिटेड कारखान्याचे लेटर हेडवर बोजा कमी करण्याचे पत्र दिले. वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन धामणगाव येथील शेतीवर कारखान्याच्या नावाचा बोजा कमी करण्याची नोंद घेतली. त्यापुर्वी लेटर हेडवर असलेल्या फोन नंबरवर संपर्क करुन खात्री केली असता बोजा कमी करण्यासाठी पत्र दिल्याची माहिती मिळाली. 

यानंतर बोजा कमी करत असल्याचे पत्र श्री.गजानन महाराज शुगर लि.या साखर कारखान्याला पाठविले.यानंतर कारखान्याने कळविले की, किरण अशोक नरवडे यांनी आमचे कारखान्याचे कोणतेही कर्ज परत केलेले नाही.तसेच बोजा कमी करण्यासाठी त्यांना कोणतेही पत्र दिलेले नाही. 

त्यामुळे नरवडे यांनी कारखान्याच्या नावाचे बनावट लेटर पँड,शिक्के,अधिकारी नाव, मोबाईल क्रमांक असे खोटे नमुद केलेले लेटर हेड तयार करून महसुल प्रशासन व श्री.गजानन महाराज शुगर लि.साखर कारखान्याची फसवणुक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे किरण अशोक नरवडे आणि अशोक जबाजी नरवडे (दोघे रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांचे विरूध्द भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार कलम ३ (५), ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) प्रमाणे गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!