शिर्डी येथे घरफोडी करणारा आरोपी धुळे येथून जेरबंद

Cityline Media
0
स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

शिर्डी प्नतिनिधी सततच्या घरफोडीमुळे त्रस्त झालेले शिर्डीकर आणि शिर्डीत कुठे ना घरफोडी हा जणू नित्य नियमच बनतो की काय? अशी शंका निर्माण होत आहे नुकतेच येथील फिर्यादी दत्तात्रय विश्वनाथ जोशी (वय - ६७) रा.गणेशवाडी, गोविंदनगर हे कामानिमित्त मुंबई येथे गेले असता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे घराचा दरवाजाचा कशाचे तरी सहाय्याने उघडुन घरातील २,६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेलेले आहे. या घरफोडीचे घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ९०७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (४),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरण कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते. 
 सुचनेनुसार पोलस निरिक्षक किरण कबाडी यांनी हा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षकदिपक मेढे,पोलीस अंमलदार विजय पवार, रमिझराजा आत्तार यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते.

पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन सदर घटना ठिकाणाच्या आजुबाजुला असलेले सी. सी. टि. व्ही. फुटेज तपासणी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करुन त्यांचे गुन्हेगारी पार्श्वभुमीचा अभ्यास केला. या माहितीचे आधारे वरील दाखल गुन्हा हा आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर रा.एकतानगर नंदुरबार याने केल्याचे निष्पन्न झाले 

या आरोपीबाबत माहिती घेत असतांना पथकास माहिती मिळाली की,सदरचा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन तो सध्या धुळे जिल्ह्यामध्ये राहत असले बाबत माहिती मिळाल्याने पथकाने धुळे जिल्हा पोलिसांना या आरोपी बाबत माहिती घेत कळविणे बाबत सांगितले असता. निजामपुर पोलीस ठाणे यांचेकडुन माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर रा.एकतानगर नंदुरबार याचेविरुध्द निजामपुर पोलीस ठाणे गु. र. नं. २७२/२०२५ महाराष्ट्र पोलीस अधिनिय कलम १२२ प्रमाणे कारवाई करुन त्यास ताब्यात घेतले असल्याचे कळविल्याने पथकाने तात्काळ निजामपुर पोलीस ठाणे धुळे येथे जावुन आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर (वय - ३२ वर्षे)रा.एकतानगर नंदुरबार त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विश्वासात घेवुन तपास करता त्याने हा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे.
आरोपी नामे पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर (वय - ३२) रा.एकतानगर नंदुरबार हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द यापुर्वी बीड, नंदुरबार जिल्ह्यामध्ये घरफोडी, नकली चलनी नोटा, चोरी चे खालीलप्रमाणे ३ गुन्हे दाखल आहेत. 

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
१) बीड शहर, जि. बीड १४२/२०१४ भादवि क ३७९ ३३४
२)जवाहरनगर, जि. नंदुरबार १६५/२०१२ भादविक ३८०
३) नंदुरबार उपनगर जि. नंदुरबार ४१८/२०२४ बी.एन.एस. क. २८०(२),१९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२), ३३३, ३५२, ३५१3(२) 
आर्म ॲक्ट ४/२५
नमुद आरोपीस शिर्डी पोलीस ठाणे गु.र.नं. ९०७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२४ चे कलम ३३१ (४), ३०५(ऐ) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!