संगमनेर विशाल वाकचौरे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर अहिल्यानगर जिल्हा समिती,संगमनेर शहर कार्यकारिणी तसेच श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय कार्यकारिणीची घोषणा नुकतीच एका कार्यक्रम प्रसंगी उत्साहात पार पडली.
या कार्यक्रमास प्रदेश मंत्री अर्थव कुलकर्णी,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक अक्षय थोरात, जिल्हा संयोजक रविकांत मोकाशी यांच्यासह परिषदेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रम दरम्यान विद्यार्थी हितासाठी परिषदेच्या आगामी कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा झाली.उत्तर अहिल्यानगर जिल्हा समितीमध्ये हर्ष खोल्लम व अंजली वारुळे हे जिल्हा सहसंयोजक,तर शिवम गिते कार्यालय मंत्री म्हणून निवडले गेले.
संगमनेर शहर कार्यकारिणीमध्ये कृपाशंकर कुशवाह यांची शहर मंत्री,यश ढोले आणि वैष्णवी शिंदे यांची शहर सहमंत्री,पार्थ नागरे यांची कार्यालय मंत्री, समृद्धी बागल यांची स्टूडेंट फॉर डेव्हलपमेंट संयोजक,कृष्णा दातीर यांची स्टूडेंट फॉर सेवा संयोजक,ओंकार देशमुख यांची अभ्यास मंडळ प्रमुख,विघ्नेश गोपाळे यांची सोशल मीडिया प्रमुख, तसेच पायल देशमुख यांची जिज्ञासा प्रमुख म्हणून निवड झाली.
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय कार्यकारिणीमध्ये सई म्हस्के अध्यक्ष,देवयानी पाटील उपाध्यक्ष,ओम कचरे मंत्री आणि भूमी उपासनी सदस्य म्हणून निवडल्या गेल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले, तर आभार प्रदर्शन नव्याने निवडलेल्या प्रतिनिधींनी केले. नव्या कार्यकारिणीच्या घोषणेनंतर परिसरात विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
