वंदे मातरम् गीताच्या १५० वर्धापन दिनानिमित्त संगमनेरात विविध कार्यक्रम उत्साहात

Cityline Media
0
संगमनेर विशाल वाकचौरे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे आणि राष्ट्रभावनेला नवी दिशा देणारे "वंदे मातरम" या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने संगमनेर येथे उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी इ.स. १८७५ मध्ये रचलेल्या "वंदे मातरम" या गीताच्या वर्धापन दिन  नुकताच येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रीडा संकुल येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन शाहीर विठ्ठल उमप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले होते.

सकाळी नऊते अकरा या वेळेत पार पडलेल्या कार्यक्रमात गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वकृत्व स्पर्धा, निबंधलेखन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार धीरज मांजरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांत अधिकारी अरुण उंडे आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲड.ईशान गणपूले उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य एस. जी. कूमावत यांनी केली, तर समारोपाचे उद्गार गटनिदेशक पी. के. बडगुजर यांनी केले.

या प्रसंगी योगेश कासट, अविनाश पुलाटे,सुमेध संत, कमलाकर भालेकर,राजेंद्र देशपांडे, गिरीश डागा,अक्षय थोरात, हरिदास कमठ (आर.एस.एस.),उद्योगपती संदीप फटांगरे, प्रशासन अधिकारी जालिंदर खताळ, क्रीडापटू प्रणिती सोमण,पत्रकार संजय अहिरे,भारत रेघाटे, विशाल वाकचौरे,गाडेकर, कल्याण राऊत,विनायक भोसले, सौरभ म्हाळस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात २६ अधिकारी, १६४ कर्मचारी, तसेच२१ शाळा आणि ४ महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले. एकूण ४११२ शालेय विद्यार्थी, ७८७ महाविद्यालयीन विद्यार्थी,तसेच शासकीय व अशासकीय आयटीआय मधील १००१ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी “वंदे मातरम” गीतावर आधारित देशभक्तिपर नाटिका सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. या नाटिकेच्या यशस्वी सादरीकरणासाठी श्रीमती एस.डी.जगताप, कु.पी.के. महतोले, कु. ए.एस.यादव,सौ.पी.एस. कांबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात ए.एस. देशपांडे, एम.बी. हिरे, एस.एम.कोल्हे, के.बी. गोडे, एम.एच. काळे, सी.एम. वीर, एन.आर. कडलग, बी.के. शिंगाडे, एन.एस. गोसावी, तसेच एस.एस. सोनवणे, डी.एन. शिरसाट, एन.एन. गोटे, के.जी.गोसावी,ओ.आर. नरवाला, ओ.डी. पांडे या सर्व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.“वंदे मातरम” या राष्ट्रभावनेला साजेशा या कार्यक्रमाने संगमनेरमध्ये देशभक्तीची लहर निर्माण केली.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!