पारनेर प्रतिनिधी तालुक्यातील नारायण गव्हाण येथे नुकतेच सुपा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या पुणे–नगर महामार्गापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर एका अंदाजे २५ त३० वयाच्या पुरुष जातीच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.
मयताचे शारीरिक वर्णन पुढीलप्रमाणे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे उंची अंदाजे ५ फुट ५ इंच रंग गोरा केस कुरळे अंगावर प्रिंटेड गुलाबी रंगाचा फुल बाहीचा शर्ट व काळ्या रंगाची अरमानीI पॅन्ट असुन डाव्या कानाखाली आई असे गोंदलेले उजव्या हातावर क्षत्रिय कुलवंतस व गणपतीचे टॅटू उजव्या हातावर लाल व भगव्या रंगाचे दोरे उजव्या व डाव्या पायाच्या अंगठ्या
डाव्या पंज्याजवळ जखमेची जुनी खुण अशा विशेष खुणा आहेत
