पारनेरच्या डिकसळ येथे रस्ता कामाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते भूमिपूजन

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे पारनेर डिकसळ येथे सूर्यवंशी वस्ती ते सुरुडा रस्ता या महत्त्वपूर्ण रस्ता कामाचे भूमिपूजन पारनेर–नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पार उत्साही वातावरणात पार पडले.
ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या रस्त्यामुळे वस्ती ते मुख्य मार्गाचे अंतर सुखकर होणार असून स्थानिक नागरिकांसह डिकसळ गावच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे.

या कार्यक्रमाला भाजप नेते सुभाष दुधाडे,गोरेगावचे उपसरपंच आण्णा नरसाळे पाटील,सरपंच साहेबराव चौधरी, मा.सरपंच भगवान शिंदे,मा. उपसरपंच गिताराम चौधरी, अध्यक्ष किसन शिंदे,उपसरपंच आशाबाई यादव येवले,युवा सहकारी प्रितेश पानमंद,दगडू शिंदे,सुमित काकडे,अरुण काकडे, सुरेश निमसे,संकेत काकडे, संकेत चौधरी,शुभम चौधरी,अनिकेत शिंदे,अजय सुर्यवंशी,मयुर शिंदे,रमेश काकडे, अतुल झंजाड, रुपेश शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

प्रसंगी गावातील युवक मित्र, महिला भगिनी आणि ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भूमिपूजन सोहळ्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.रस्ता काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचा भाव दिसून येत होता.आमदार दाते यांनी पुढील काळातही डिकसळ व परिसरातील विकासकामांना प्राधान्य देण्याचा विश्वास व्यक्त केला.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!