संगमनेर प्नतिनिधी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांनी संघटीत सरपंच चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांची नुकतीच त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट झाली.
या भेटीत राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा केली प्रसंगी बाबासाहेब पावसे म्हणाले बंटी यादव हे लोकहितासाठी झटणारे व्यक्तीमत्व आहे श्री यादव यांची क्रियाशीलता समाजातील शोषित वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूस म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तत्पर आहे.
आमच्या असंघटित सरपंचांच्या संघटनासाठी देखील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे सर्व सामान्य लोकांच्या अडी अडचणीला धावुन जाणारे व्यक्तीमत्व आहे म्हणून आम्ही सरपंच सेवा संघाच्या कार्यकर्ते त्यांच्या कडे बघतो या भेटीत संगमनेर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनू गायकवाड देखील उपस्थित होते.
बाबासाहेब पावसे यांनी सरपंचांना एकत्र करून त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाबद्दल त्यांना राज्य पातळीवर सन्मान मिळाला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामविकासाचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
या भेटीच्या माध्यमातून बंटी यादव आणि बाबासाहेब पावसे पाटील यांच्यातील राजकीय आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
