जनतेचा विश्वास,सेवेसाठी समर्पित लोकसंग्राहक नेतृत्व सौ.कविता कैलास पाटील

Cityline Media
0


 मा.तालुका अध्यक्षा.भाजपा महिला मोर्चा संगमनेर 

उमेदवारी इच्छुक – जिल्हा परिषद समनापूर गट

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील निमोण समनापुर गट परिसरात जनतेची हक्काची माणसं म्हणून ओळखले जाणारे कविता कैलास पाटील ह्या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निमोण समनापुर गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असून,भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.
जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने निस्वार्थी पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि करत आहेत.

 शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी
कविता कैलास पाटील या पदवीधर व उच्चशिक्षित महिला असुन त्यांना जनसामान्य जनतेची तळमळ असलेल्या त्या महिला आहेत ९ टक्के समाजकारण१० टक्के राजकारण असा त्यांच्या काम होरा आहे.

 राजकीय कार्य आणि संघटन बांधणी                    ‌‌-त्यांचे कुटुंब आणि त्या विखे घरण्यांशी प्रामाणिक असुन विखे ‌सर्मथक म्हणून त्या पंचक्रोशीत परिचित आहे पक्षात काम करत असताना पक्षाने आणि नामदार राधाकृष्ण विखे पा‌.यांनी चुल आणि मुल याबरोबरच अध्यक्ष पदाची जबाबदारी  त्यांच्यावर सोपावुन एक नवतेज महिला चेहरा आणि सर्व सामान्य महिला म्हणून न्याय देण्याचे काम विखे पाटीलांनी केले आहे.

गेल्या १० वर्षांपासून त्या आणि त्यांचे कुटुंब भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून सतत जनतेच्या सेवेत आहेत पक्षसंघटन बळकटीसाठी संपूर्ण संगमनेर तालुक्यात उल्लेखनीय काम त्यांनी केलेले आहे विशेषतः ते भूमिपुत्र असलेल्या निमोण  समनापुर पट्ट्यात अनेक सामाजिक व जनहिताच्या कामांत मोलाचे योगदान आणि अनेक सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून जनसेवेसाठी कायम तत्पर असे काम त्यांनी उभे केलेले आहे.शेतकरी आणि त्यांच्या अडचणी हा त्यांचा महत्त्वाचा जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय असून ते त्याच्यावर दुर्लक्षितांवर अधिक जास्त निर्भीडपणे काम करत असून भविष्यात हे काम अतिशय जोरदार पद्धतीने करायची त्यांची भूमिका व इच्छा आहे.

समाजातील दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी त्यांच्या कोणत्याही अडचणीसाठी त्या सदैव तत्पर राहून काम करत आहेत.
 लोकाभिमुख नेतृत्वाची ओळख
बचतगटांच्या माध्यमातून महिला संघटन,बांधकाम कामगारांच्या समस्या,लाडकी बहिण योजना रेशन,बालसंगोपन आदी लोकाभिमुख योजनांसाठी प्रशासकीय कार्यालये, तहसील,प्रांत,जिल्हा परिषद, भुमीअभिलेख, वनविभाग,जिल्हाधिकारी कार्यालय प्रसंगी मंत्रालय तसेच जनसेवा ऑफिस लोणी,संगमनेर,महायुती ऑफिस आदी.पर्यंत प्रत्यक्ष घेऊन जाऊन समस्या सोडविण्यासाठी  प्रयत्न करण्याचं काम करत आलेल्या.लोकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणणारी आणि त्यासाठी प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करणारी एक अत्यंत धाडसी आणि ध्येयवादी महिला सक्रिय कार्यकर्त्या म्हणून कविता कैलास पाटील यांची जनतेच्या मनात एक स्वच्छ प्रतिमा त्यांनी तयार केलेली आहे.

शेतकऱ्यांच्या तसेच जनतेच्या विज,मूलभूत गरजांपैकी पाणी, रस्ता,आरोग्य, शिक्षण या सुविधा पुरविण्यासाठी त्या कायम सरकार दरबारी पाठपुरावा करण्यासाठी आग्रही राहिलेल्या आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली
 निवडणूक २०२४ मधील सहभाग
२०२४ मधील संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारात मोलाची भूमिका निभावली.
भाजपाच्या विकास विचारांचा प्रसार आणि प्रचार करून त्यांनी महायुतीचा आमदार निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावलेली आहे.
भविष्यातील दृष्टीकोन
 जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला तर मी माझ्या गटातील जनतेचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून जनतेसाठी त्यांचे हक्काचे आणि मूलभूत प्रश्न जसे की रस्ते,आरोग्य,दर्जेदार शिक्षण,पाणी अशा अनेक समाज विकासाच्या कामासाठी स्वतःला वाहून घेण्याची मानसिकता असून मी सतत क्रियाशील राहिलं असा आशावाद व्यक्त करत मी राजकारणासाठी नाही तर समाजकारणासाठी आले आहे.
सौ‌.कविता कैलास पाटील
उमेदवारी इच्छुक – जिल्हा परिषद समनापूर गट

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!