श्रीरामपूर दिपक कदम शहरातील महत्वाच्या रस्त्यावर अनेक वाहनधारक बेशिस्तपणे आपली वाहने लावतात,त्यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होतो. बेफिकेरीस शहरात वाहतूकीस शिस्त लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओळखून अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशान्वे
नुकतेच शहरात ट्रीपल शीट चाललेल्या २३ वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्यावर २३ हजार रुपये दंड करण्यात आला, ब्लॅक फिल्मच्या १३ केसेस होऊन त्यांच्यावर ६ हजार पाचशे रुपये, नंबरप्लेट नसणाऱ्या १६ वाहनधारकांवर ८ हजार रुपये दंड करण्यात लायसन्स नसणाऱ्या ३७ जणांवर १८ हजार पाचशे रुपये दंड ठोठावण्यात आला.
