संकल्पित रिपब्लिकन पक्षाची आग्रही भूमिका
नाशिक दिनकर गायकवाड शहर आणि जिल्ह्यातील अनेकांच्या जीवनात शैक्षणिक बदल घडविणाऱ्या आणि जबाबदार नागरिक बनविणाऱ्या येथील बी.डी भालेकर शाळेच्या जागी शाळाच बांधावी या मागणीचे निवेदन येथील संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नुकतेच नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत देण्यात आले.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.डी. भालेकर शाळेच्या प्रस्तावित प्रस्तावित निर्णयाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या विद्यालयाच्या जागेवर कोणतीही इतर शासकीय इमारत उभी न करता विद्येचं मंदिर अर्थात विद्यालय उभं करावं अशी आग्रही भूमिका पक्षप्रमुख प्रकाश पगारे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना करण्यात आली.
सामान्य नाशिककरांच जनमत लक्षात घेऊन पुढील निर्णय शासनाने करावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली या शिष्टमंडळात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय बाबा सानप, नाशिक संपर्क प्रमुख हनुमंतराव काळे, निफाड तालुका अध्यक्ष केदु गायकवाड, शहराध्यक्ष गौतम जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
