श्रीरामपूर: दिपक कदम येथील विन्सेन्शन मिशन सर्विस सोसायटी संचलित डि.पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूलने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालय देवळाली येथे नुकत्याच भरविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय शुटिंग व्हॉलीबॉल(१७ वर्षे वयोगट-मुले) स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रसंगी विजयी डिपॉल संघाला महाराष्ट्र राज्य शुटिंग व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव मुस्ताक शेख,सेक्रेटरी राजेंद्र पुजारी,कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जाधव,श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कडूस तसेच भांड यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी विजयी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक संदीप निबे,संदीप जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत असून श्रीरामपूर डिपॉल संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो, प्रशासक फा.फ्रँको,स्टेट बोर्ड स्कूलच्या प्राचार्या सिस्टर ब्लेसा,समन्वयक सि.रेन्नी,सचिव मॉली कुथूर,वरिष्ठ लिपीक रवींद्र लोंढे,दिपक कदम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.तसेच सोलापूर येथे होणाऱ्या आगामी विभागीय शालेय शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
