दाढ खुर्द शिवारात १६ वर्षीय तरुणावर हिंसक बिबट्याचा हल्ला

Cityline Media
0
दाढ खुर्द ग्रामस्थांच्या शौर्यामुळे वाचले तरुणाचे प्राण

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या दाढ खुर्द शिवारात सोमवारी नुकतेच  जनावरांसाठी चारा कापत असलेल्या एका १६ वर्षीय तरुणावर हिंसक बिबट्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.प्रसंगी पायाला गंभीर दुखापत झाल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला,प्रसंगावधान राखत तरुणाने केलेला आरडाओरडा आणि ग्रामस्थांनी दाखवलेले शौर्य यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर तासाभरातच वनविभागाने घटनास्थळी पिंजरा उभारून तत्परता दाखवली आहे आणि बिबट्या एका शेतातून दुसऱ्या ‌शेतात लुप्त झाला.
झुडपात दबा धरून हल्ला झालेल्या तरुणाबद्दल 
दाढ खुर्दचे प्रथम नागरिक तथा कृतिशील नेतृत्व सरपंच सतीश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार,ईश्वर सुर्यभान जोशी (वय १६) हा तरुण शेतात चारा कापत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घेत हल्ला केला.पायाला बिबट्याच्या तीक्ष्ण पंजाने जखम झाली.

हल्ल्यामुळे घाबरलेल्या ईश्वराने मोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली आणि पळ काढला,मात्र काही अंतरावर तो बेशुद्ध पडला.यावेळी दाढ खुर्द ग्रामस्थांच्या शौर्यपूर्ण धावपळीमुळे त्याचे प्राण वाचले जखमी तरुणाला लोणी रुग्णालयात दाखल केले.

प्रसंगी ईश्वरच्या मदतीसाठी ज्ञानेश्वर तुकाराम जोशी त्यांच्या मदतीला ज्ञानेश्वर वाडगे,नाना वाघमारे, बाळासाहेब जोशी, सुर्यभान जोशी,संपत जोशी, संदिप जोरी,सार्थक जोशी,महेश रहाटळ, सोमनाथ आडभाई, बाळासाहेब आडभाई आदी ग्रामस्थ धावले.

या सर्वांच्या मदतीने ईश्वरला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.या घटनेनंतर 
वनविभागाने तात्काळ कारवाई केली असून तासाभरात पिंजरा लावला घटनेची माहिती मिळताच सरपंच सतीश जोशी यांनी तात्काळ वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्याशी संपर्क केला.

त्यांनी क्षणाचा विलंब न करता वनपाल सुजित बोकडे,वनरक्षक रामेश्वर मंडपे, वनसेवक देविदास चौधरी, सुखदेव सूळ,नजीर शेख,उत्तम भुसारी यांना तातडीच्या सूचना दिल्या. या पथकाने विजेच्या गतीने दाढ खुर्दमध्ये धाव घेत अवघ्या तासाभरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा उभारला.

विशेष म्हणजे, काही तासांपूर्वीच याच शिवारात बिबट्याच्या एका बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच पुन्हा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले असून,दाढ खुर्द परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!