झरेकाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कु.नंदिनी प्रेमदास चव्हाण रा . तळेगाव तालुका चाळीसगाव हल्ली मुक्काम कोपरगांव हिच्या वारसांना शासनाच्या तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा सौ शालिनी विखे पा.यांच्या हस्ते देण्यात आला.
जलसंपदा मंत्री, पालकमंत्री पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी शासनाकडे विशेष प्रयत्न करून २५ लाख रकमेपैकी तातडीची मदत १० लाख रुपयाचा धनादेश वारसांना प्रदान आला.नुकतेच सायंकाळी ७ ते ७:३० वाजे दरम्यान ऊस तोड कामगारांच्या झोपडी शेजारी कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण ही खेळत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाली.
चव्हाण कुटुंब हे चाळीसगाव येथून ऊस तोडणीसाठी कोपरगांव येथे आले आहे.पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी शासनाच्या वतीने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यांनतर आज वनविभागाने तातडीची मदत म्हणून दहा लाखाचा धनादेश वारसदार प्रेमदास गोरख चव्हाण यांना जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.शालिनी विखे पा. यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
