आश्वी संजय गायकवाड संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सामाजिक,राजकिय धार्मिक क्षेत्रात कार्यरत नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रगतशिल शेतकरी तसेच आश्वी खुर्द परिसरात विविध सहकारी संस्थामध्येही विविध पदे भुषविणारे शिवाजी बाळकृष्ण भोसले यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यु समयी त्यांचे वय ६७ वर्ष होते.
त्यांच्या पश्चात पत्नी एक भाऊ भावजय चुलते एक मुलगा सुन तिन मुली जावई चुलत भाऊ नातवंडे असा मोठा परिवार आहे.
येथील प्रवरा उद्योग समुहात कार्यरत असलेले शिक्षक मयुर भोसले यांचेवडील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवराव भोसले मा.जि.प. सदस्य आण्णासाहेब भोसले यांचे पुतणे तर पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे संचालक ॲड. अनिल भोसले आश्वी खुर्द सेवा सोसायटीचे अध्यक्ष विजय भोसले डॉ.विरेश भोसले गबाजी भोसले गणेश भोसले यांचे बंधु तर आश्वी खुर्द ग्रा.प.सदस्य संजय भोसले पुणे येथील उदयोजक अशोक भोसले यांचे चुलते होत.त्यांच्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
