दाढ खुर्द मध्ये लंपीच्या आजाराने गायीचा मृत्यू

Cityline Media
0
दाढ खुर्द किशोर वाघमारे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे लंपी आजाराच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून येथील शेतकऱ्यांच्या गाई, कालवडी मृत्यूचे प्रमाण वाढले असून येथील दुग्ध धंदा करणारा शेतकरी अडचणीत आला आहे.
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाने लंपी या आजारासाठी कोणतेही ठोस पावले उचलले नाही १००टक्के लसीकरण न केल्यामुळे येथे लंपी या आजाराचा गेल्या अनेक महिन्यापासून प्रादुर्भाव वाढला असून येथील अनेक शेतकऱ्यांच्या गाई कालवडी मृत पावले आहे.

येथील शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका बाजूला दुधाला भाव नसून दुसऱ्या बाजूला काही जनावरे कवडीमोल भावाने विकावी  लागली त्यातच असे आजार आल्याने शेतकऱ्यांनी काय करायचे कारण येथील शेतकऱ्याला शेती व्यवसाय बरोबर दुग्ध व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय असून या व्यवसायामुळे येथील शेतकरी आपले जीवनमान जगत आहे.

दुग्ध व गाई व्यवसायावर शेतकऱ्याचे जगणे अवलंबून असून आजच्या दैनंदिन जीवनामध्ये शेतकऱ्यांचा जनावरांचा विमा नसल्यामुळे शेतकऱ्याची गाई मेल्यानंतर शेतकरी मोठा अडचणीत येत असतो त्यामुळे शासनाने या परिसरातील सर्व गाईंचे पिक विमा प्रमाणे 

गाईंचा पण विमा शेळ्या बकऱ्याचा पण विमा शासनाने सर्वे करून उतरावा कारण गाई मृत झाली तर शेतकऱ्याला त्या विम्याचे पैसे मिळतील व त्या पैशातून दुसरी गाय त्याला खरेदी करून आपला जीवनमान जगता येईल त्यामुळे शेतकऱ्यांचे जनावराचा विमा उतरावा अशी मागणी येथील शेतकरी वर्गांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!